

PattanKodoli Yatra Farande Bhaknuk
esakal
Maharashtra Rain Update : श्री विठ्ठल-बिरदेव यात्रेत भाकणूक करणारे फरांडेबाबा यांनी महाराष्ट्रात पुढील पाच दिवसांत पाऊस होईल, असे भाकीत केले होते. त्यानंतर पाचव्या दिवशी महाराष्ट्रातील अनेक भागात पाऊस होत आहे. दरम्यान, पट्टणकोडोलीसह परिसरात जोरदार पाऊस झाल्याने त्यांच्या भाकणुकीची चर्चा सुरू झाली आहे. भाकणुकीचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे.