“Farandebaba delivering his annual prophecy at Pattan Kodoli — hints of political turmoil ahead in Maharashtra.”
Sakal
कोल्हापूर
पट्टणकोडोलीत फरांडे बाबांची भाकणूक जाहीर; राज्याच्या राजकारणावर महत्त्वपूर्ण वक्तव्य, राजकारणात पुन्हा गोंधळ माजून उलथापालथ होईल..
Thousands Gather for Vittal-Birdev Yatra: श्रीक्षेत्र विठ्ठल बिरदेव यात्रेत कायदा सुव्यवस्था तसेच अन्य बाबींचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि जिल्हा पोलिस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यात्रेला भेट दिली. पोलिस अधीक्षक गुप्ता यांनी सीसीटीव्ही, पोलिस नियंत्रण कक्षांना भेट दिली.
पट्टणकोडोली : लाखो भाविकांच्या उपस्थितीत विठ्ठल-बिरदेवाच्या नावानं चांगभलंच्या जयघोषात, ढोल-कैताळांच्या निनादात, खोबरे, लोकर, खारीक, भंडाऱ्याच्या अखंड उधळणीत भक्तिमय वातावरणात येथील प्रसिद्ध श्री विठ्ठल बिरदेवाच्या यात्रेस आज प्रारंभ झाला. फरांडे बाबा यांना दुपारी १ वाजून २६ मिनिटांनी हेडाम नृत्य करण्यास सुरुवात केली. यानंतर विठ्ठल बिरदेव मंदिरात भाकणूक झाली.