
शिवाजी यादव
कोल्हापूर : ग्रामीण भागातील शेती व्यवसायाला तंत्रज्ञानाची जोड मिळावी, शेती उत्पादन वाढावे, प्रक्रिया उद्योग, रोजगाराला चालना मिळावी, यासाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) संस्था, कृषी विभाग, समाज कल्याण विभाग शेतकरी गट व शेतकरी कंपन्यांसाठी योजना राबवते. त्यानुसार जिल्हाभरात दोन हजार अधिक शेतकरी गट स्थापन झाले. मात्र, प्रत्यक्ष प्रकल्प उभारणीचे काम रखडले आहे.