
Kolhapur River Tragedy : कोपार्डे (ता. करवीर) येथे कुंभी नदीच्या पुराच्या पाण्यात बुडून आज शेतकऱ्याचा मृत्यू झाला. सर्जेराव श्रावणा कांबळे (वय ६७) असे त्यांचे नाव आहे. करवीर पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः कुंभी नदीला पुराचे पाणी वाढले आहे. परिसरात, शेत शिवारात, उसात, पिकांत पुराचे पाणी आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतात आणि चारा आणण्यासाठी जाताना पाण्याचा अंदाज येत नसल्याचे चित्र आहे.