esakal | शिवाजी विद्यापीठात शेतकरी देत आहेत परिक्षा
sakal

बोलून बातमी शोधा

shivaji univercity

शिवाजी विद्यापीठात शेतकरी देत आहेत परिक्षा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कोविड-१९ (covid 19) मुळे शिक्षणाची, जगण्याची सर्व परिमाणे बदलून टाकली; मात्र नव्या ‘न्यू नॉर्मल’शी जोडून घेण्यामध्ये आपले शेतकरी बांधवही मागे नाहीत. याची प्रचिती शिवाजी विद्यापीठाच्या (shivaji univercity) रेशीमशास्त्र विषयातील पदविका अभ्यासक्रमांदरम्यान आली. राज्याच्या विविध भागांतील ४६ शेतकऱ्यांनी या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊन ऑनलाईन माध्यमातून हे अभ्यासक्रम पूर्ण केले; शिवाय, आता ते ऑनलाईन परीक्षाही यशस्वीपणे देत आहेत. नव तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीतील नवे ज्ञान आत्मसात करण्याची शेतकऱ्यांची ही जिज्ञासा तरुण विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक स्वरुपाची ठरली आहे.

शिवाजी विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र अधिविभागातील सेंटर ऑफ एक्सलन्स अॅन्ड इनक्युबेशन इन सेरीकल्चर यांच्यामार्फत २०१७-१८ पासून रेशीमशास्त्र पदविका आणि पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम शेतकऱ्यांसाठी सुरू केले. देशातील अकृषी व कृषी विद्यापीठांत अशा प्रकारचा अभ्यासक्रम चालविणारे शिवाजी विद्यापीठ पहिले, एकमेव आहे. दरवर्षी पदविका, पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमांसाठी प्रत्येकी 40 जागांवर रेशीमशेती करू इच्छिणारे तसेच त्याविषयी अभ्यास करू इच्छिणारे शेतकरी, प्रवेश घेतात. कौशल्याला शास्त्रीय ज्ञानाची जोड मिळाल्याने त्यातील अनेक यशस्वी रेशीम उद्योजक बनले आहेत.

हेही वाचा: मुंबईला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा विळखा? रुग्णांमध्ये 20 टक्के वाढ

गत वर्षभरात कोविड-१९ चा प्रादुर्भाव असतानाही शेतकरी अभ्यासक्रमात ऑनलाईन सहभागी झाले. चार विषयांसाठीची ऑनलाईन व्याख्याने, एक प्रात्यक्षिक पेपर, एका प्रकल्पाद्वारे त्यांनी ऑनलाईन अभ्यासक्रम पूर्ण केला. या शेतकऱ्यांच्या ऑनलाईन परीक्षेला कालपासून (दि. ४) सुरवात झाली. खाद्य वनस्पती लागवड व व्यवस्थापन या विषयाची ऑनलाईन परीक्षा ४६ शेतकऱ्यांनी यशस्वीरित्या दिली. ही परीक्षा ९ सप्टेंबरपर्यंत आहे. यासाठी प्राणीशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. ए.ए. देशमुख, रेशीमशास्त्र अभ्यासक्रम समन्वयक डॉ. ए. डी. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा प्रमुख डॉ. अण्णा गोफणे परीक्षा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेत आहेत.

loading image
go to top