

Shaktipeeth Highway Protest in Kolhapur
esakal
Shaktipeeth Highway Route : शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचा विरोध तीव्र झाला आहे. कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील वाकरे येथे खुपिरे, शिंदेवाडी, साबळेवाडी, वाकरे आणि कुडित्रे परिसरातील शेतकरी व महिला मोठ्या संख्येने एकत्र येत शेतात ठिय्या आंदोलनाला बसले. ‘रक्तपात झाला, जीव गेला तरी चालेल; पण शेती सोडणार नाही,’ असा आक्रमक पवित्रा घेत महिलांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.