

Farmers Padayatra for sugarcane rate
sakal
नूल: गडहिंग्लज,आजरा आणि चंदगड तालुक्यांतील पाच साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांना ३६०० रुपये पहिली उचल आणि थकीत एफआरपी व फरकापोटी ३१ कोटी द्यावेत, या प्रमुख मागणीसाठी स्वातंत्र्यसैनिकांचे गाव म्हणून ओळखणाऱ्या नूलमधून पदयात्रेला शुक्रवारी सुरुवात झाली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने या पदयात्रेचे नियोजन करण्यात आले आहे.