

Dhanaji Chudamunge addresses the ‘Andolan Ankush’ Elgar Parishad in Shirol; demands ₹4,000 as first cane installment for farmers.
Sakal
शिरोळ: ‘साखर कारखाने केवळ एफआरपी देऊन शेतकऱ्यांची लूट करीत आहेत. कारखाने नफ्यात असतानाही कमीत कमी दर देऊन फसवत आहेत. रिकव्हरीतून शरद, गुरुदत्त, जवाहर व दत्त आदी कारखाने प्रत्येकवर्षी शंभर कोटींपेक्षा मिळवत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना चालू वर्षाची पहिली उचल चार हजार रुपये व गेल्या वर्षीचे दोनशे रुपये दिल्याशिवाय उसाला कोयता लावू देणार नाही’, असा इशारा ‘आंदोलन अंकुश’चे संस्थापक धनाजी चुडमुंगे यांनी आठव्या एल्गार परिषदेमध्ये दिला.