दोन बाटल्या भरुन त्याने आणले पेट्रोल अन् घेतले अंगावर ओतुन...

Farmers today tried to commit suicide at the gate of the kolhapur municipality
Farmers today tried to commit suicide at the gate of the kolhapur municipality
Updated on

कोल्हापूर - कसबा बावडा येथील आनंदा करपे या शेतकऱ्याने आज महापालिकेच्या गेटवरच आत्मदहनाचा प्रयत्न केला. पण, त्यांना तत्काळ महापालिका कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले. टीडीआर स्वरूपातील मोबदला मिळण्यात दिरंगाई होत असल्याच्या निषेधार्थ या शेतकऱ्याने हे पाऊल उचलले. यासंदर्भात त्यांनी वारंवार महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. तसेच महापालिका आयुक्तांना निवेदन तसेच प्रत्यक्ष भेटूनही पाठपुरावा केला होता. परंतु, त्याची दखल न घेतली गेल्याने कर्जबाजारी झाल्यामुळे आपल्याला हे पाऊल उचलावे लागत असल्याचे सांगत आनंद करपे यांनी आज दुपारी महापालिकेत जात आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. याच दरम्यान महापालिकेची सर्वसाधारण सभा सुरू होणार असल्याने विठ्ठल रामजी शिंदे चौकात नगरसेवक, कर्मचारी व नागरिक होते. आत्मदहनाचा प्रयत्न होताच महापालिका वर्तुळात खळबळ उडाली.

या शेतकऱ्याने आयुक्तांना पाठविलेले पत्र असे : नमस्ते सर, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्तसाहेब. मी आनंदा करपे आपणास दि. 4/2/2019 रोजी माझ्या मालकीचे आरक्षित मिळकतीचे TDR स्वरूपात मोबदला मिळणे कामी आपल्याकडून होत असलेले दिरंगाईबाबात आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. नंतर आपली वैयक्तिक पातळीवर भेट घेऊनसुद्धा आपण कोणतीही कारवाई केली नाही. नियमात नसताना रक्कम 75,79,434 इतक्या रकमेचे विकसन करून घेतले आहे व आजतागायत मोबदला देण्याची कारवाई न करून आपण व्यक्तिगतपणे आमची फसवणूक आम्हास आर्थिक संकटात लोटून कर्जबाजारी केले आहे. सदर त्रासामुळे आपल्या कार्यालयात सर्व नागरिक व पत्रकारांसमोर दि 17.03.2020 रोजी मी आत्मदहन करीत आहे. त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील.

तीन दिवसांपूर्वी दिलेल्या पत्रानुसार आनंदा करपे हे आज दुपारी 12 नंतर महापालिकेत आले. त्यांनी दोन बाटल्यांतून पेट्रोल आणले होते. महापालिका इमारतीच्या गेटवरच त्यांना अडवण्यात आले. त्यांनी हातातील बाटल्यांतील पेट्रोल अंगावर ओतून घेतले. गेटवर असलेल्या पोलिस व अग्नि शमन दलाच्या जवानांनी पुढील कृती करण्याआधीच त्यांना झडप टाकून ताब्यात घेतले. आनंदा करपे यांना तत्काळ आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या भेटीसाठी आयुक्त कार्यालयात नेण्यात आले. नंतर त्याला लक्ष्मीपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले.

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com