
Chhava Movie: छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित छावा सिनेमाची सध्या महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात चर्चा आहे. लहानथोरांनी हा सिनेमा बघावा असा सल्ला हा सिनेमा पाहिलेले अनेकजण देत आहेत. त्यामुळंच एका शिवभक्त बापानं आपल्या लेकीच्या वाढदिवसानिमित्त अख्ख थिएटरच बुक केलं आणि बच्चे कंपनीला 'छावा' हा सिनेमा दाखवला. कोल्हापुरात हा प्रसंग घडला आहे.