कोल्हापूर - कोरोना बाधित डॉक्‍टरमुळे समहू संसर्गाची भीती 

Fear of group infection due to corona infected doctor in kolhapur
Fear of group infection due to corona infected doctor in kolhapur

गडहिंग्लज (कोल्हापूर) : दोन दिवसांपूर्वी शहरातील राजेंद्र प्रसाद रोड परिसरातील एका डॉक्‍टरचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांच्या प्रथम संपर्कातील यादी मोठी असून शहरासह तालुक्‍यातील 28 गावांमधील 539 जणांचा त्यात समावेश आहे. यामुळे समूह संसर्गाची "रिस्क' वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. दोन दिवसांपासून या लोकांचा शोध घेऊन त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. प्रथम संपर्कातील संख्या पाहून तालुक्‍यात खळबळ उडाली आहे. 

संबंधित डॉक्‍टरांमध्ये 21 जूनपासून लक्षणे दिसू लागली. तेव्हापासून त्यांनी गडहिंग्लज आणि कडगाव येथील क्‍लिनीकमध्ये तपासलेल्या रुग्णांची यादी प्रशासनाने मिळविली आहे. स्वॅब दिल्यानंतरही डॉक्‍टरांनी रुग्णांची तपासणी केल्याची माहिती प्रशासनाला मिळाली आहे. यामुळे संपर्कातील प्रत्येक माणूस शोधून काढण्याची कसरत करावी लागत आहे. प्रथम संपर्कात आलेल्या शहरातील 277 तर तालुक्‍यातील 28 विविध गावांमधील 191 जणांचा यात समावेश आहे. यामध्ये कडगाव येथे तपासणी केलेल्या नागरिकांची संख्या 84 आहे. नगरपालिका प्रशासनाने 277 पैकी 150 लोकांना शोधले असून त्यांना संस्थात्मक अलगीकरण केंद्रात हलवण्याची प्रक्रिया सुरू होती. तसेच ग्रामीण भागातील लोकांनाही शोधून त्यांनाही क्वारंटाईन करण्याची कार्यवाही ग्रामदक्षता समितीकडून सुरू झाली आहे. याशिवाय यादीतील उर्वरित रुग्णांच्या नावावरून शोध घेण्याचा प्रयत्न केला असला तरी बहुतांश लोकांचा संपर्क होऊ शकलेला नाही. काही जणांचे यादीत नाव असले तरी ते तपासणीसाठी डॉक्‍टरकडे आले नसल्याचे निष्पन्न झाले आहे. मोबाईल क्रमांक, गावचे नाव नसलेले लोक शोधणे आव्हानाचे ठरत आहे. 

प्रशासनाची धावपळ 

डॉक्‍टरांच्या संपर्कातील व ट्रेसिंग झालेल्या लोकांमधील कोरोनाची लक्षणे आणि विविध व्याधीग्रस्त असलेल्यांना कोव्हीड सेंटरला हलविण्याची कार्यवाही सुरू होती. लक्षणे असणाऱ्यांचेच स्वॅब घेतले जाणार आहेत. आज काहींचे स्वॅब घेतल्याचेही सांगण्यात आले. पालिकेच्या पथकाकडून डॉक्‍टरांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेणे, क्वारंटाईन आणि स्वॅबसाठी संबंधितांना पाठविण्याची प्रक्रिया दिवसभर सुरू होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com