लॉकडाउनच्या भीतीने खेळाडूंसमोर नवे संकट; भवितव्याची चिंता, खेळाडूंसह प्रशिक्षकही धास्तावले

fear of lockdown on players of kolhapur competition of olympic
fear of lockdown on players of kolhapur competition of olympic

कोल्हापूर : वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा सुरू होणारे क्रीडा क्षेत्र परत एकदा भीतीच्या छायेत आहे. ऑलिंपिक स्पर्धांच्या तोंडावर कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्यामुळे खेळाडूंसह प्रशिक्षक धास्तावले आहेत. गतवर्षी ऐन हंगामात जगभरावर कोरोनाचे संकट आले. क्रीडा स्पर्धा बंद झाल्या आणि ऑलिंपिकही पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. यंदा नियोजित असणाऱ्या स्पर्धेत कोल्हापूरचे अनेक खेळाडू संभाव्य संघात आहेत.

कोरोना संकटात  खेळाडूंनी स्वतःला स्पर्धायोग्य ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. असे असताना पुन्हा लॉकडाउनच्या भीतीने अनेक अडचणींवर मात करत केलेली मेहनत वाया जाण्याची शक्‍यता आहे. लॉकडाउनचे निर्बंध शिथिल होताना राज्य, राष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंनाच सरावाला परवानगी दिली होती, असे असताना पुन्हा हे सर्व थांबण्याची चिन्हे आहेत. 

आहार आणि व्यायामाचे सूत्र 

खेळाडूसाठी त्याचा डाएट महत्त्वाचा असतो. अचानक बदललेल्या परिस्थितीमुळे त्याच्या डाएटमध्ये बदल होतो. या बदलामुळे समतोल बिघडला जातो. याचा परिणाम मैदानावरील चपळाई आणि एकाग्रतेवर होतो.

असे होणार परिणाम -

  •     शारीरिक 

सर्व सत्र थांबल्यास शारीरिक क्षमतेवर याचा परिणाम होतो. नियमित सरावात असणे यामुळे स्पर्धेसाठी मानसिकता अधिक प्रबळ बनत असते. याबरोबर सरावादरम्यान चुका सुधारण्याची आणि स्वतःसाठी नवीन शिकण्याची अधिक संधी असते.

  •     मानसिक 

सर्व सत्रातील खंडामुळे खेळाडूचे मानसिक खच्चीकरण होण्याची शक्‍यता अधिक असते. यातच केलेली मेहनत वाया गेल्याची नकारात्मकता त्याच्या इतक्‍या वर्षांच्या मेहनतीवर पाणी फिरवते. सरावात खंडामुळे स्पर्धासमयी दृढ निश्‍चय आणि एकाग्रता नष्ट होते. तसेच मनात असणारी अनाहूत भीती खेळाडूला खेळापासून परावृत्त करते.

"शासनाने आज जाहीर केलेल्या निर्बंधांत क्रीडा क्षेत्रासंबंधातील निर्बंधांची नेमकी नियमावली जाहीर केलेली नाही. नियमावली प्राप्त झाल्यानंतरच सराव आणि स्पर्धांबाबत स्पष्टता येईल. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूंना सरावात सूट मिळण्याची शक्‍यता आहे."

- डॉ. चंद्रशेखर साखरे, जिल्हा क्रीडा अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com