

fertilizer price hike before kharif season India
esakal
Kharif Season Fertilizer Rates : (कुंडलिक पाटील) : पश्चिम महाराष्ट्र आणि कोल्हापूर जिल्ह्यात खरीप हंगामाच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठी भर पडली आहे .खत कंपन्यांनी खरिपाच्या ऐन तोंडावर खतांच्या दरात प्रति बॅग तब्बल २०० ते ४०० रुपयांची वाढ केली आहे. केंद्र सरकारने एकीकडे खत अनुदानात १२ टक्के वाढ केल्याचे जाहीर केले असले, तरी प्रत्यक्षात खत कंपन्यांनी ही दरवाढ लादल्याने 'एकीकडे द्यायचे आणि दुसरीकडे काढून घ्यायचे' असाच प्रकार समोर येत आहे. यामुळे शेतीचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडण्याची भीती व्यक्त होत असून शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे.