

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी शहरातील रस्त्यांच्या दर्जात्मक विकासासाठी ४०९ कोटींचा प्रस्ताव सादर केला आहे.
esakal
Smooth Roads for Kolhapur : कोल्हापूर शहरातील मुख्य रस्त्यांसह अन्य १६६ रस्ते करण्यासाठी ४०९ कोटींचे दोन प्रस्ताव महापालिकेने दिले आहेत. ते ‘मित्रा’ व राज्य सरकारकडे निधीसाठी सादर केले जाणार आहेत, असे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले. तोपर्यंत तातडीने डांबरी प्रकल्प भाडेतत्त्वावर घेऊन आठ दिवसांत खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात करा. दोन महिन्यांत नवीन डांबरी प्रकल्प सुरू झालाच पाहिजे, अशा सक्त सूचना महापालिकेला दिल्या असल्याचेही त्यांनी सांगितले. बैठकीतील आदेशामुळे आठ दिवसांत शहरात विविध सुविधांमध्ये फरक जाणवेल, असा विश्वास व्यक्त केला.