'दोन तासच फटाके फोडण्यास परवानगी' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Firecrackers are allowed for two hours only

सायंकाळी सात ते रात्री नऊ पर्यंतच फटाके फोडण्यात याची परवानगी देण्यात आली आहे.

'दोन तासच फटाके फोडण्यास परवानगी'

sakal_logo
By
सुनील पाटील

कोल्हापूर : दिवाळी सणा दरम्यान सायंकाळी सात ते रात्री नऊ पर्यंतच फटाके फोडण्यात याची परवानगी देण्यात आली आहे.  हरित लवादाने दिलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन करावे, अन्यथा संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, असा इशाराही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिला.

जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, महानगरपालिका व सर्व नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रामध्ये हरीत लवादाच्या आदेशानुसार कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हवा प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी फटाके वाजवणे किंवा फोडण्यासाठी सायंकाळी 7  ते रात्री 9 वाजेपर्यंत परवानगी आहे. इतर वेळी किंवा रात्री उशिरा फटाके फोडणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. हरित लवादानुसार  शोभेची दारु (फटाका) विक्री व त्याच्या वापराबाबत आदेश दिलेले आहेत. 

हे पण वाचा - पुणे पदवीधर मतदार संघातून अरुण लाड यांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर  

मुंबई, पुणे, सांगली जिल्ह्या नंतर आता कोल्हापुरातही हा निर्णय घेण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना संसर्ग कमी होत आहे. मात्र अद्यापही तो पूर्णपणे संपला, असे म्हणता येत नाही. तसेच दिवाळीदरम्यान जिल्ह्यातील आणि शहरातील हवा शुद्ध राहावी यासाठीही लोकांनी प्रयत्न केले पाहिजेत. फटाके फोडण्याची ऐवजी दिवे लावून दिवाळी साजरी करावी, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


संपादन - धनाजी सुर्वे 

loading image
go to top