Success Story : व्हायचं होतं कार्डिओलॉजिस्ट पण झाली 'सीए' ; देशात प्रथम आलेल्या निधीचा प्रेरणादायी प्रवास

First in the country in the CA Foundation exam nidhi lalwani success story education marathi news
First in the country in the CA Foundation exam nidhi lalwani success story education marathi news
Updated on

इचलकरंजी (कोल्हापूर) :  खरं तर मला मेडिकल मध्ये प्रवेश घेऊन कार्डिओलॉजिस्ट बनायचं होतं. पण तो विचार सोडून मी वाणिज्य शाखेला प्रवेश घेतला. ध्येय निश्चित केले आणि त्याचा पाठलाग सुरू केला कोणत्याही स्थितीत ध्येय गाठायचं अशी जिद्द मनात ठेवून केलेल्या परिश्रमाचे फळ मिळाले आणि मी देशात अव्वल आले. इचलकरंजी यथील डी के टी संस्थेच्या इंग्लिश मिडीयम हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी निधी दिनेशकुमार ललवानी आपल्या यशाचे रहस्य सांगत होती.
  निधी ही सीए फाउंडेशन परीक्षेत देशात प्रथम आली आहे. तिला 400 पैकी 361 गुण मिळाले आहेत.  याच शाळेतील अन्य दोन विद्यार्थी देशातील पहिल्या 50 मध्ये गुणवत्तेत आल्या आहेत. 

स्वप्न सत्यात उतरण्यासाठी प्रयत्न

प्राथमिक शिक्षणापासून ते महाविद्यालयपर्यंत डी के टी संस्थेतच  शिक्षण पूर्ण केले. प्रत्येक टप्प्यावर असणाऱ्या वेगवेगळ्या परीक्षेला बसले आणि या सर्व परीक्षेत मला उज्वल यश मिळत गेले. दहावीला आणि बारावीला 97 टक्के गुण मिळवले याशिवाय एमटीएस एनटीएस प्रज्ञाशोध यासह शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवत असे. या प्रत्येक यशाच्या नंतर माझा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून जो सत्कार व्हायचा त्यातून एक मला एक वेगळी प्रेरणा मिळत गेली. सत्काराने माझ्या जिद्दीला आणखीनच बळ मिळाले. आपण सर्वोच्च सत्काराचा क्षण आयुष्यात कधी नाही कधी आणायचे हे मी स्वप्न पाहिले होते आणि हे स्वप्न सीए फाउंडेशन परीक्षेच्या निमित्ताने पूर्ण केले. 

असा केला अभ्यास

अभ्यासात नेहमी सातत्य ठेवणे आवश्यक असल्याचे सांगून निधी म्हणाली इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये असताना मी अकरावीपासूनच या परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली महाविद्यालयाच्या अकॅडमीमध्ये यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जात होते. त्यावेळी मी नियमितपणे दोन ते तीन तास अभ्यास केला. अभ्यास करून पूर्ण झाल्या नंतर मात्र वेगळे नियोजन निश्चित केले रोज किमान सहा ते सात तास अभ्यास करायचा याचा आराखडा तयार केला. यासह सात ते सात तासाच्या वेळेत कोणता अभ्यासपूर्ण करायचे याचे नियोजन केले. जे ठरवले ते त्या दिवशी पूर्णच करायचे अशी जिद्द ठेवली. त्यासाठी कितीही वेळ लागला तरी चालेल, झोपेला काही वेळ बाजूला ठेवायचे आणि आपले उद्दिष्ट पूर्ण करायचे यामध्ये मी सातत्य ठेवले. 

भावामुळे प्रेरणा मिळाली

निधी म्हणाली ,"परिश्रमपूर्वक  अभ्यास केला होता. त्यामुळे चांगले यश मिळणार याची खात्री होती  400 पैकी किमान तीनशेच्या टप्पा मी निश्चित पार करणार याची खात्री होती.मात्र निकालानंतर देशात अव्वल आलेला क्षण माझ्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा ठरला. वडील बिजनेस करतात तर भाऊ हा सीए झाला आहे. तोही याच महाविद्यालयात शिकत होता. प्रत्येक अभ्यासाच्या टप्प्यावर त्याचे मिळालेले मार्गदर्शन मला खूपच अनमोल ठरले. शिक्षकांचे परिश्रम आणि माझी जिद्द यामुळेच मी हे स्वप्न साकारले आहे. या परीक्षेला बसताना विद्यार्थ्यांनी मोठ्या परिश्रमाची तयारी ठेवून जिद्दीने अभ्यास करण्याची गरज असल्याचे सांगितले.


परीक्षेसाठी असाही वेगळा पॅटर्न

वाणिज्य विभाग प्रमुख प्राध्यापक चौगुले म्हणाले, आम्ही या परीक्षेसाठी एक वेगळा पॅटर्न तयार केला प्रत्येक विद्यार्थ्याला या अभ्यासक्रमाचा आनंद मिळावा या दृष्टीने आम्ही शिक्षण पद्धत निश्चित केली होती. प्रवेश घेताना भरपूर कष्ट करण्याची तयारी ठेवा हे त्यांच्या मनात बिंबवले होते. सुट्टीच्या दिवशीही भले भूक लागली तरी चिरमुरे खाऊन भूक भागवा मात्र ठरलेला अभ्यासक्रम पूर्ण करा अशीच पद्धत आम्ही अवलंबली आणि त्याचे यश म्हणून निधीही फाउंडेशन परीक्षेत देशात प्रथम आली. प्राचार्या माला सूद यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच प्राध्यापकांनी यासाठी नियोजनबद्धरीत्या अभ्यासक्रम असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com