
कोल्हापूर : सिद्धार्थनगर चौकात शुक्रवारी रात्री झालेल्या दगडफेकप्रकरणी पाच संशयितांना रविवारी रात्री अटक करण्यात आली. तौफिक शेख, निहाल शेख, सद्दाम महात, अश्पाक नायकवडी आणि इक्बाल सरकवास अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात ४०० जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.