
-संदीप जगताप
इचलकरंजी : इचलकरंजी पंचगंगा नदीस गतवर्षी आलेल्या पुरामध्ये अनेकांना नुकसान सहन करावे लागले. यावेळी स्थानिक प्रशासनाने अनेक कुटुंबांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित केले होते. त्यामधील ८२७ पुरग्रस्तांना १० हजार रुपयांप्रमाणे ८२ लाख ७० हजार इतकी रक्कम वाटप केली. मात्र, पुरामुळे पडझड झालेल्या घरांची तसेच व्यावसायिक हे अद्याप शासनाकडून मिळणाऱ्या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. यावर्षी पूरस्थिती निर्माण होण्याची चिन्हे असताना गतवर्षी केवळ पंचनामे करण्याचे सोपस्कार पूर्ण केलेल्या प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.