

व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करताना ३ कोटींचा माल जप्त.
esakal
Ratnagiri Crime News : रत्नागिरी एमआयडीसी परिसरात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मोठी कारवाई केली. पथकाने व्हेल या लुप्तप्राय प्रजातीच्या माशाची उलटी तस्करी आणि विक्रीसाठी आलेल्या तिघा संशयितांना रंगेहाथ पकडले. रोहित रमेश चव्हाण (रा. आंबेशेत), आसिफ अस्लम मोरस्कर (पिंपरीबुद्रुक, चिपळूण), तेजस परशुराम कांबळे (रा. अडरे, चिपळूण) अशी तिघा संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून उलटी जप्त केली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची किंमत तब्बल ३ कोटी १० लाख ३० हजार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.