कोल्हापूर जिल्हा बॅंकेत ‘स्वीकृत संचालक’साठी इच्छुकांची मोर्चेबांधणी

दोन्ही काँग्रेसला एक एक जागा मिळण्याची शक्यता
KDCC Bank
KDCC Bank Sakal

कोल्हापूर : आता स्वीकृत संचालक पदासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सद्यस्थितीत दोन्ही काँग्रेसला(congress) प्रत्येकी एक जागा मिळू शकते. पण, इथेही आमदार विनय कोरे(mla vinay kore) यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना एखादी जागा मिळण्याची शक्यता आहे. कोरे यांच्याकडून शाहूवाडीचे राजकारण डोळ्यापुढे ठेवून निवडणुकीत पराभूत झालेले सर्जेराव पाटील-पेरीडकर यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

जिल्हा बँकेत(kolhapur district bank) स्वीकृत संचालक पदाच्या दोन जागा आहेत. यापूर्वी या पदावर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार व बँकेचे निवृत्त कर्मचारी व माजी अध्यक्षांचे पूत्र आसिफ फरास यांना संधी दिली होती. या वेळी पॅनेल करताना शिरोळ तालुका विकास संस्था गटातील तिढा सोडवण्यासाठी माघार घेणाऱ्याला स्वीकृत पदी संधी देण्याचे ठरले होते. त्यातून ‘दत्त-शिरोळ’च्या गणपतराव पाटील यांना ही संधी मिळाली असती. पण, तेच रिंगणात उतरल्याने त्यांचा विचार होणार नाही.

प्रक्रिया व पतसंस्था गटातील पराभवामुळे नाराज झालेल्या कोरे यांची समजूत काढण्यासाठी राष्ट्रवादीच्या वाट्याची जागा त्यांना दिली जाण्याची शक्यता आहे. पूर्वी राष्ट्रवादीकडून कागलचे राजकारण डोळ्यापुढे ठेवून माजी आमदार संजय घाटगे यांना स्वीकृतपदी संधी दिली जाणार होती. पण, घाटगे यांनी नकार दिला. त्यामुळे कोरे यांना ही जागा जाऊ शकते. तसे झाल्यास कोरे यांच्याकडून माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर यांना शह म्हणून पेरीडकर यांना संधी दिली जाईल. अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीनंतर या घडामोडींना वेग येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com