
Ashokrao Mane vs Raju Awale : कोल्हापूर येथील बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेला साडेसात एकर जमीन भाडेतत्त्वावर देऊ केली आहे. ही जमीन गावाची असून, ती बेकायदेशीर पद्धतीने खोटी कागदपत्रे जोडून आणि फेरफार डायरीत खाडाखोड करून दिली असल्याचा आरोप वाठार ग्रामस्थांनी केला. याबाबत बेमुदत उपोषण सुरू होते यावर काल उपोषणाचा १८ वा दिवस होता. तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली.