

मागील १० वर्षांपासून ऊसदराच्या आंदोलनापासून दूर असलेले माजी आमदार उल्हास पाटील यांनी शिरोळ तालुक्यात सुरू असलेल्या ‘अंकुश’ संघटनेच्या ऊसदर आंदोलनाला दिला पाठींबा.
esakal
Shirol Sugarcane News : दत्त व गुरुदत्त या साखर कारखान्यांनी पंधरा दिवसांनंतर ३४०० व गाळप हंगाम संपल्यानंतर शंभर रुपये असा दर जाहीर केला आहे, हा दर ‘आंदोलन अंकुश’ संघटनेला मान्य नसल्याने ऊसतोड बंद आंदोलन सुरूच ठेवले आहे. शनिवारी दुपारी साखर कारखान्यांना नियमबाह्य ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना ‘आंदोलन अंकुश’चे कार्यकर्ते रोखत असताना कारखाना समर्थकांनी धनाजी चुडमुंगे यांना धक्काबुक्की केली. यानंतर शिरोळमध्ये दिवसभर वातावरण तणावपूर्ण बनले होते. रात्री उशिरा आंदोलक कार्यकर्त्यांना नोटीस लागू करून सोडून देण्यात आले.