
चार वर्षांपूर्वी सोयाबीनचा दर नऊ हजार रुपयांवर गेला होता.
esakal
मुख्य ठळक मुद्दे (Highlights)
सोयाबीन दरघटीस सरकार जबाबदार — केंद्र सरकारच्या पामतेल आयात धोरणामुळे सोयाबीनचा दर चार हजारांवर आला, असा गंभीर आरोप राजू शेट्टी यांनी केला.
एफआरपीप्रमाणे सोयाबीन दर ठरवण्याची मागणी — ऊस पिकासारखा हमीभाव कायदा सोयाबीनलाही लागू करावा, अशी ठाम भूमिका माजी खासदारांची.
सीमाभागात शेतकऱ्यांचे २५ कोटींचे नुकसान — विक्री केंद्रांच्या अभावामुळे शेतकऱ्यांना आधारभूत किमतीपेक्षा कमी दर मिळत असल्याची माहिती संघटनेने परिषदेत दिली.
Raju Shetti On Central Government : ‘केंद्र सरकारने पाम तेलाच्या आयातीवर निर्बंध घातले असते, तर सोयाबीनचा दर १२ हजारांवर गेला असता. अमेरिकेच्या धोरणाला सरकार बळी पडल्यास शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांनी सोयाबीन विकावे लागेल. अशा विविध सरकारी धोरणांमुळे सोयाबीनचे भाव पडले आहेत’, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. दरम्यान, ऊस पिकासाठीच्या एफआरपी कायद्याप्रमाणे सोयाबीन पिकाचा दरही ठरवण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.