
Kolhapur Crime
कोल्हापूर : फुलेवाडी रिंगरोडवरील गंगाई लॉनच्या पिछाडीस झालेल्या महेश राजेंद्र राख (वय २३, रा. होळकरनगर, रिंगरोड) याच्या खूनप्रकरणी चौघांना पोलिसांकडून अटक झाली. पियुष अमर पाटील (२३, माजगावकरनगर), मयूर दयानंद कांबळे (२२, महालक्ष्मी कॉलनी, साने गुरुजी वसाहत), सोहम संजय शेळके (२२, रा. गजानन महाराज नगर) व बालाजी गोविंद देऊलकर (वय २५, रा. पाचगाव) अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी पहिल्यादिवशी सात संशयितांची नावे समोर आली होती. तपासात आणखीन काही नावे निष्पन्न करण्यात आली आहेत.