esakal | ब्रेकिंग - कोल्हापुरातील आणखी ३९ जणांना कोरोनाची लागण 
sakal

बोलून बातमी शोधा

four corona positive patient in kolhapur ajara

हे रुग्ण क्वारंटाईनमध्ये  होते. नुकतेच त्यांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. 

ब्रेकिंग - कोल्हापुरातील आणखी ३९ जणांना कोरोनाची लागण 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - कालपासून जिल्ह्याला धक्यावर धक्के बसत असतानाच आता पुन्हा आणखी 39 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आज दिवसभरात ५ वाजून १५ मिनिटापर्यंत ३९ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात रूग्णांची संख्या आता १२२ वर पोहोचली आहे.

कोल्हापुरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आता सापडलेल्या रूग्णांपैकी आजरा तालुक्यातील बेलेवाडी येथील तीन आणि भादवन येथील एकाचा समावेश आहे. 

दरम्यान, रूग्ण संख्या वाढत असली तरी कोल्हापुकरांसाठी दिलासादायक बाब म्हणजे राज्य शासनाने वाढवलेल्या लॉकडाऊनच्या नियम व अटींमध्ये कोल्हापूरला जैसे थे ऑरेंज झोनमध्ये ठेवले आहे. त्यामुळे, कडक आणि सक्त नियमांचा रेडझोन कोल्हापूरकरांना वाट्याला आलेला नाही. राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील जिल्ह्यांना लागू असणाऱ्या नियम अटींचे परिपत्रक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दिले आहे.

हे पण वाचा -  कोरोनाचा प्रसार थांबवायचाय! तर अशा हव्यात उपाययोजना; प्रसाराची ही आहेत प्रमुख कारणे 

राज्यातील रेडझोनमध्ये असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये मुंबई, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांचा समोवश आहे. तर पूर्वीचे जिल्ह्यात ग्रीनझोनमध्ये होते ते ग्रीनमध्यच आणि ऑरेंजमध्ये असणारे ऑरेंजमध्ये ठेवण्यात आले आहेत. तर कोल्हापूर जिल्हा ऑरेंज झोनमध्ये होता तो तसाच ठेवण्यात आला आहे.

हे पण वाचा -  धीर धरा ! कोल्हापूरवासीयांनो पॅनिक होऊ नका, संख्या वाढत असली तरी ही आहे दिलासादायक बाब 
 

loading image
go to top