

Kolhapur House fire in Rui
esakal
Rui Kolhapur fire incident : (मनोज अथणे) : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात रुई येथील हुल्ले गल्ली परिसरात शनिवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे चार घरांना भीषण आग लागली. या दुर्घटनेत सुभाष हुल्ले, सुभाष धड्डे, पदुबाई हुल्ले आणि प्रकाश हुल्ले यांच्या घरांचे मोठे नुकसान झाले. तसेच भरत धड्डे यांचे संसारोपयोगी साहित्यही आगीत जळून खाक झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, घरात काहीच उरले नसल्याने गावकऱ्यांनी मदतीची हाक देताच गावातील लोकांसह अनेकांनी मदत केल्याने पिडीत कुटुंबियांसाठी अवघ्या ५ तासात लाखात रक्कम उभा करण्यात आली आहे.