
कोल्हापूर : चांदी व्यापाऱ्याकडून दागिने बनवून घेऊन त्या बदल्यात कमी टंचाची चांदी देत १० लाख ४५ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला. धनंजय दिलीप पाटील (वय २६), दीपक मनोहर वाईंगडे (३३) व सचिन शिवाजी साबळे (३६, तिघे रा. रेंदाळ, हातकणंगले) अशी संशयितांची नावे आहेत. याबाबत कल्पेश माणिकचंद ओसवाल (४०, रा. भक्तिपूजानगर, मंगळवार पेठ) यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.