
जयसिंगपूर : ट्रेडिंग कंपनीमध्ये गुंतवणूक करतो, असे सांगून ८१ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी श्रेणिक दत्तात्रय गुरव (मूळ हरोली, ता. शिरोळ सध्या रा. ग्रीन व्हॉली अपार्टमेंट स्टेशन रोड, जयसिंगपूर) याच्यावर जयसिंगपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद विजय बाळासाहेब माणगावे यांनी जयसिंगपूर पोलिसांत दिली. याप्रकरणी श्रेणिक गुरव याला जयसिंगपूर पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली आहे.