
Kolhapur Illegal Hoardings
esakal
सण-उत्सवात राजकीय जाहिरातबाजी:
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक इच्छुकांनी गणेशोत्सव, नवरात्रोत्सव यांसारख्या सणांचा वापर करून डिजिटल फलक, कमानी यामधून स्वतःचा प्रचार सुरू केला आहे.
शहराचे विद्रुपीकरण व गैरसोय:
वीज खांब, शासकीय इमारती, केएमटी बस थांबे यांच्यावर डिजिटल फलक व पोस्टर लावल्याने शहराचे सौंदर्य बिघडले असून प्रवाशांना व नागरिकांना गैरसोय होत आहे.
वाहतूक व भाविकांवर परिणाम:
मुख्य चौक, रस्ते व मंडळांच्या परिसरात उभारलेल्या कमानींनी वाहतुकीला अडथळा निर्माण केला असून, पादचारी मार्ग व बस थांबेही झाकले जात आहेत; यावर प्रशासन कारवाई करणार का याकडे लोकांचे लक्ष आहे.
Political Banners Kolhapur : महापालिकेच्या इच्छुकांनी सण-उत्सवांचा इव्हेंट बनवत, प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. चार सदस्यीय प्रभाग रचनेमुळे शेजारी भागात पोहोचण्यासाठी डिजिटल फलकांचा आधार घेतला जात आहे. मात्र, ज्या महापालिकेतून तुम्ही जनतेचे प्रश्न सोडविणार आहात, त्याच भागात डिजिटल फलकांद्वारे शहराचे विद्रुपीकरण सुरू आहे. काहींनी तर केएमटी बस थांबेच झाकून टाकल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. वीज खांब, शासकीय इमारतीही पोस्टरबाजीतून सुटलेले नाहीत. प्रशासन यावर कोणती कारवाई करणार याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.