कोल्हापुरात दोन्ही आघाड्यांकडून मतदारांच्या हालचालींवर 'वॉच' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Politics

दोन्ही उमेदवारांकडून मतदारांना आपल्याच बाजूने मतदान करावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे.

कोल्हापुरात दोन्ही आघाड्यांकडून मतदारांच्या हालचालींवर 'वॉच'

कोल्हापूर : विधानपरिषदेसाठी महाविकास आघाडी व भाजपकडून मतदारांनी आपल्याच मतदान करावे, यासाठी सर्व पातळीवर फिल्डिंग लावली जात आहे. उमेदवार व त्यांचे समर्थक मतदारांच्या भेटीला गावोगाव जात आहेत. मेळावे, वैयक्तिक भेटीसह मध्यस्त्यांमार्फतही मतदानासाठी आवाहन केले जात आहे. दरम्यान, प्रत्येक मतदाराच्या हालचालींवर दोन्ही उमेदवारांकडून नजर ठेवण्यासाठी यंत्रणाही गतीमान झाली आहे. दोन्ही उमेदवारांकडून मतदारांना आपल्याच बाजूने मतदान करावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे.

हेही वाचा: कर्नाटकात पावसाचं थैमान; महिनाभरात 24 जणांचा मृत्यू

प्रत्येकाकडून शब्द घेतला जात आहे. नेता कुठेही जावो पण तुम्ही आमच्यासोबत असले पाहिजे, असा प्रचार केला जात आहे. दरम्यान, जस-जसे मतदानासाठी दिवस कमी राहिले आहेत. तस-तसा प्रचाराने गती घेतली आहे. उमदेवारी अर्ज भरण्यासाठीही जास्ती-जास्त लोक मतदार व महत्वाचे नेते येतील याची काळजी घेतली आहे.

चार दिवसापूर्वी पालकमंत्री सतेज पाटील यांनी आपला उमदेवारी अर्ज दाखल केला आहे. तर, आज माजी आमदार अमल महाडिक हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. यासाठी सर्व तयारी करण्यात आली. उमेदवारांकडून मतदारांची विशेष काळजी घेतली जात आहे. त्यांच्या सर्व कार्यक्रमांना हजेरी लावली जात आहे. मतदार जिल्हा परिषद सदस्य असो किंवा नगरसेवक असो त्यांच्या वैयक्तिरित्या समस्या ऐकून घेवून तात्काळ सोडवण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. एकूणच निवडणूकीचा फायदा मतदार घेत आहेत. तर काही मतदार अजूनही कोणाकडून जायचे या द्विदावस्थेत आहेत.

हेही वाचा: 'कबूल, कबूल, कबूल', मलिकांनी मध्यरात्री टाकला बॉम्ब; वानखेडेंची झोप उडणार?

loading image
go to top