Voters Offered Money and Gifts : नगरपरिषदेची निवडणूक कधी नव्हे इतकी यंदा चुरशीची ठरली. वास्तविक मतदानाच्या आदल्या रात्री मतदारांना ‘लक्ष्मीदर्शन’ करण्याची पद्धत रूढ झालेली; परंतु यंदाच्या निवडणुकीत मात्र मतदानाच्या आधी चार दिवसांपासूनच त्याची सुरुवात करण्यात आली.
गडहिंग्लज : येथील नगरपरिषद निवडणुकीसाठी झालेले मतदान प्रक्रिया ‘लक्ष्मीदर्शना’ने चांगलीच गाजली आहे. मतदानाला जातानाही वाटेत भेटून ‘लक्ष्मीदर्शन’ घडविण्याचा प्रकार शहराच्या संस्कृतीला काळिमा फासणारा ठरला.