गडहिंग्लज : पॉलिटेक्निक प्रवेशप्रक्रिया सुरू

३० जूनअखेर मुदत, ७ जुलैला गुणवत्ता यादी
admissions starts for pharmacy and polytechnic
admissions starts for pharmacy and polytechnic

गडहिंग्लज : तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे पदविका आभियांत्रिकी (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशप्रक्रियेला सुरुवात झाली आहे. अद्याप दहावीचा निकाल लागला नसला तरी विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात. विद्यार्थ्यांना आँनलाईन पद्धतीने ३० जून अखेर अर्ज करण्याची मुदत आहे. कच्ची गुणवत्ता यादी ३ जुलैला तर पक्की ७ जुलैला जाहीर होणार आहे.

http://poly२२.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर हे अर्ज सादर करावयाचे आहेत. खुल्या गटासाठी ४०० तर राखीव प्रवर्गाला ३०० रुपये प्रवेश अर्जाची किंमत आहे. सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना या ठिकाणी मोफत अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध असेल. विद्यार्थ्यांनी मूळ प्रमाणत्रे याच कालावधीत पडताळणी करून घ्यावयाची आहेत. ७ जुलैला पक्की यादी लागेल. त्यानंतर पसंतीक्रम भरण्याच्या फेऱ्या होणार आहेत. त्याचे सविस्तर वेळापत्रक जाहीर करणार असल्याचे तंत्रशिक्षण संचलनालयाने स्पष्ट केले आहे. दहावीच्या निकालानंतर हे वेळापत्रक लागण्याची अपेक्षा आहे. संकेतस्थळाशी संर्पकात राहण्याचे आवाहन तंत्रशिक्षण संचालनालयाने केले आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com