

Candidates and party workers canvassing voters door-to-door during Gadhinglaj elections.
sakal
गडहिंग्लज : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गडहिंग्लज तालुक्यात प्रचाराला वेग आला आहे. संपूर्ण तालुका सध्या निवडणुकीच्या वातावरणात रंगून गेला आहे. उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी अक्षरशः पायाला भिंगरी बांधून प्रचार सुरू केल्याचे चित्र गावोगावी पाहायला मिळत आहे. गल्लीबोळ, वाडी-वस्ती, शेतवस्तीपर्यंत पोहोचत उमेदवार मतदारांशी थेट संवाद साधत आहेत.
प्रतिनिधी