

Kolhapur Crime
Sakal
कोल्हापूर : शिवाजी पेठेतील रंकाळा तलावासमोर असलेल्या एका मंडळाच्या खोलीत चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. तीन पानी जुगार खेळणाऱ्या नऊ संशयितांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून रोख ४० हजार रुपये, मोबाईल, दुचाकी असा दीड लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.