

Kolhapur Police Ganesh Visarjan management
ESakal
कोल्हापूर : प्रत्येक मंडळाला ‘टायमर’द्वारे दिलेला वेळ, मंडळाकडून दोनच वाहनांचा वापर, वेळकाढू मंडळांवर ‘पुश स्कॉड’ची नजर, आगमन आणि विसर्जन दिवशीच साउंड सिस्टीमचा वापर असे प्रयोग यशस्वी करण्यात आले. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन केलेल ‘परफेक्ट’ नियोजन, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी त्याला दिलेली ‘साथ’ यातून यंदाची मिरवणूक गतवर्षीच्या तुलनेत चार तास अगोदर संपल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे. मध्यरात्री तीनच्या सुमारास पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते शेवटच्या गणेशमूर्तीची आरती करून मिरवणुकीची सांगता करण्यात आली.