15 tola gold jewellery and 100 mobile phones stolen during Ganesh Visarjan procession."
Sakal
कोल्हापूर
Kolhapur Crime: विसर्जन मिरवणुकीत १५ तोळे दागिने, १०० मोबाईलवर डल्ला
Theft During Ganesh Visarjan: मिरवणुकीत सहभागानंतर नृत्यात हरपलेल्या तरुणांचे मोबाईल चोरीचे तसेच गहाळ झाल्याचे प्रकार घडले. मध्यरात्री साउंड सिस्टीम बंद झाल्यानंतर अनेकांना हा प्रकार समजला. तसेच काही महिलांचे दागिनेही चोरीस गेले आहेत.
काेल्हापूर: विसर्जन मिरवणुकीत कार्यकर्त्यांच्या उत्साहामध्ये चोरट्यांनी संधी साधल्याचे दिसून आले. महाद्वार रोड परिसरात ठिकठिकाणी भाविकांचे १०६ मोबाईल, १५ तोळ्यांहून अधिक वजनाचे दागिने व पाच ते सहा दुचाकी चोरीस गेल्याचे प्रकार घडले. मध्यरात्रीनंतर घरी परतत असताना अनेकांच्या लक्षात हे प्रकार आले. काहींनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पण, कागदपत्रांअभावी गुन्हे दाखल करण्याचे काम अर्धवट राहिले.

