
Karad Robbery News : कोल्हापुरातील एका कुरिअर कंपनीच्या कुरिअर बॉयला मारहाण करून त्याच्याकडील सुमारे ७० लाख रुपयांचे दागिने असलेली बॅग चोरट्यांच्या टोळीने लंपास केली. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वराडे (ता. कऱ्हाड) गावच्या हद्दीत असलेल्या श्रावणी हॉटेलजवळ मंगळवारी मध्यरात्री हा प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांनी राहुल दिनकर शिंगाडे (वय २८, रा. शिंगणापूर, ता. माण) याला अटक केली असून, त्याच्या साथीदारांचा शोध सुरू आहे.