
कागल बस स्थानक
esakal
ठळक मुद्दे (Highlights):
अपहरणातून सुटका: निपाणीची अल्पवयीन मुलगी कागलहून अपहरण करून पंढरपूर, मुंबईमार्गे बुरंबाड (संगमेश्वर) येथे आणली होती; मात्र संधी साधून ती घरातून पळाली.
रिक्षाचालकाची धाडसी भूमिका: कोंडिवरेतील रिक्षाचालक इरफान खान यांनी मुलगी रडत पळताना पाहताच पोलिसांना कळवले व तिची सुटका घडवली.
पोलिसांची कारवाई: माखजन पोलिसांनी तत्परतेने मुलीला ताब्यात घेऊन निपाणी पोलिसांच्या स्वाधीन केले; आरोपी विघ्नेश संजय गुरव व त्याच्या आईवर कारवाई.
Sangmeshwar Crime : संगमेश्वर तालुक्यातील कोंडिवरे येथील रिक्षाचालकाच्या प्रसंगावधानतेमुळे व माखजन पोलिसांच्या तत्परतेमुळे कागल येथून पळवून आणलेली निपाणीची अल्पवयीन मुलगी नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आली. कागल बसथांब्यावर मित्राने हत्याराचा धाक दाखवून एसटीने तिला पंढरपूर येथे नेले. तिचा मोबाईल फोडून सीम तोडून टाकले. पंढरपूर येथून मुंबई-दादर येथे आणि तेथून परत पंढरपूर, कऱ्हाड आणि चार दिवसांपूर्वी तिला घेऊन तो बुरंबाडला (ता. संगमेश्वर) घेऊन आला होता.