...तर मुली पुढाकार कधी घेणार?

e girls should come forward to report the 1091 number
e girls should come forward to report the 1091 number

कोल्हापूर - महिलांच्या सुटकेसाठी ल्पलाईन क्रमांक अस्तित्वात असला तरी तीन महिन्यांत छेडछाडीची एकच तक्रार त्यावर आली आहे. छेडछाडीचे प्रकार घडत असताना त्याला लगाम बसण्यासाठी महिला व युवती पुढाकार कधी घेणार, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. पोलिसांच्या हेल्पलाईनला आलेल्या तक्रारीचा हा आकडा अत्यल्प असल्याचे समोर आले आहे. 

संकटात सापडलेल्या तरुणी, महिलांच्या मदतीसाठी पोलिस प्रशासनाने 1091 ही हेल्पलाईन सुरू केली आहे. या हेल्पलाईनशी संपर्क साधल्यानंतर त्वरित त्या मुलीला मदत केली जाते, असे असले तरी वास्तवात मात्र नवऱ्याने मारले, सासू छळ करत आहे, अशा घरगुती भांडणांच्याच तक्रारी या हेल्पलाईनवर येतात, तर सर्वांसाठी असलेल्या 100 हा हेल्पलाईन क्रमांक व्यस्त लागला म्हणूनही काही तक्रारी या क्रमांकावर येत असल्याचे दिसून येते. या हेल्पलाईनवर महिन्यातून सरासरी 10 तक्रारी येतात, त्यातील तरुणी, महिलांच्या तक्रारी अत्यल्पच असल्याची माहिती 1091 वर संपर्क साधला असता पोलिस कर्मचारी एस. व्ही. दाभाडे यांनी दिली. 

तक्रारदाराचे नाव गोपनीय 
महिलांनी मोबाईलमध्ये 1091 हा हेल्पलाईन क्रमांक जतन करून ठेवावा, यासाठी पोलिस प्रशासनाने वेळोवेळी आवाहन केले आहे. संकटप्रसंगी तत्काळ मदत उभी करण्यासाठी पोलिसांच्या गस्ती पथकांसह विशेष निर्भया पथकांची नेमणूकही केली आहे. ही पथके शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात कार्यरत असतात. शिवाय महाविद्यालय, शाळांमध्येही छेडछाड विरोधी पथके तयार केली आहेत. हेल्पलाईन आणि निर्भया पथकाच्या व्हॉटस्‌ऍप क्रमांकावर दाखल झालेल्या तक्रारींची तत्काळ नोंद घेतली जाते. घटनास्थळाच्या जवळच्या पोलिस ठाण्यात कळवून पोलिसांना पाठवले जाते. तसेच तक्रारदार तरुणी, महिलेचे नाव गोपनीयही ठेवले जाते, मात्र छेडछाडी व महिलांच्या अत्याचारांच्या घटना घडू नयेत, यासाठी तरुणी, महिलांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. 

दृष्टिक्षेपात... 
 डिसेंबर- 13 तक्रारी 
 जानेवारी- 11 तक्रारी 
 फेब्रुवारी- 0 
 
जनजागृतीला प्रतिसादही नाही 
तरुणी व महिलांच्या मदतीसाठी दक्ष असलेल्या पोलिस प्रशासनाने या हेल्पलाईनसोबतच निर्भया पथकाचीही स्थापना केली आहे. 
या पथकातर्फे शाळा, महाविद्यालयांतील तरुणींना छेडछाड म्हणजे काय? असा प्रसंग ओढवल्यानंतर काय करायचे? निर्भया पथकाची मदत कशी घ्यायची? गुड टच, बॅड टच तसेच हेल्पलाईनबाबत प्रबोधन सुरू केले आहे; मात्र शहरातील काही शाळा, महाविद्यालयांकडून या पथकाच्या जनजागृतीला प्रतिसादच मिळत नाही. "सकाळ'ने यापूर्वीही निर्भयापथकाच्या मार्गदर्शन शिबिराबाबत शाळा, महाविद्यालयांच्या असलेल्या उदासीनतेवर प्रकाश टाकला होता. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com