

Global Flower Festival kolhapur
esakal
Flower Festival Kolhapur : रात्रीच्या अंधारात रंग, सुगंध अन् सौंदर्यपूर्ण देखण्या फुलांच्या माध्यमातून साकारलेला अद््भुत आविष्कार आज कोल्हापूरकर, भाविक, पर्यटकांनी अनुभवला. ‘सकाळ’ प्रस्तुत ग्लोबल फ्लॉवर फेस्टिव्हलमध्ये ‘नाईट ब्लूम एक्सपिरियन्स’ने पोलिस उद्यानामधील उपस्थितांना निसर्गाच्या एका वेगळ्याच रूपाची अनुभूती दिली. दरम्यान, फेस्टिव्हलच्या दुसऱ्या दिवशी आज तुडुंब गर्दी झाली.
दरम्यान, सकाळी सातपासूनच फेस्टिव्हल सर्वांसाठी खुला होतो. साहजिकच शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थीही मोठ्या संख्येने महोत्सवाला भेट देऊ लागले आहेत. दुपारच्या सत्रात होणाऱ्या विविध कार्यशाळा, प्रात्यक्षिकांनाही प्रतिसाद मिळतो आहे.