Vinay Kore Allegations Satej Patil : गोकुळमध्ये पैशांची पाकिटे वाटल्याचा सतेज पाटलांवर विनय कोरेंचा थेट आरोप; २५ उमेदवारांच्या नावाने पाकिटे असल्याचा दावा

Gokul Election Controversy : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत पैशांच्या पाकिटांवरून नवा वाद निर्माण झाला आहे. आमदार विनय कोरे यांनी सतेज पाटील यांच्यावर आरोप करत २५ उमेदवारांच्या नावाने पाकिटे असल्याचा दावा केला.
Vinay Kore Allegations Satej Patil gokul milk election

Vinay Kore Allegations Satej Patil gokul milk election

esakal

Updated on: 

Gokul Election Cash Distribution : गोकुळ दूध संघाच्या मतदानासाठी अवघे चार दिवस शिल्लक असताना आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे. महायुती आणि समविचारी आघाडीकडून ठरावधारकांशी संपर्क साधण्याबरोबरच बैठकांचे सत्र सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आमदार विनय कोरे यांनी समविचारी आघाडीचे प्रमुख नेते सतेज पाटील यांच्यावर ठरावधारकांना पैसे वाटल्याचा थेट आरोप केला आहे. उमेदवारांच्या नावानुसार वेगवेगळ्या रकमेची पाकिटे तयार करण्यात आल्याचा दावा कोरे यांनी ठरावधारकांच्या मेळाव्यात केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com