
Gokul Dairy Kolhapur
esakal
Gokul Dairy Controversy : गोकुळ निवडणुकीत मतदानासाठी दिल्या जाणाऱ्या ठरावाचा लिलाव करावा, अशी मागणी विरोधी गटाच्या सभासदाने केली. तुमची सत्ता होती, त्यावेळी ठरावाचा लिलाव का केला नाही, असा प्रतिप्रश्न सत्ताधारी गटातील सभासदांनी विरोधकांना केला. यावरून कळे (ता. पन्हाळा) येथील धर्मराज दूध संस्थेच्या वार्षिक सभेत एकच राडा झाला. दोन्ही गटांतील सभासद एकमेकांच्या अंगावर धावले. दूध संस्थेच्या अध्यक्षा मालुबाई देसाई यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली.