नेत्यांचा एकेरी उल्लेख...'गोकुळ'च्या संचालकासह 6 जणांवर गुन्हा

संचालकांसह सहा जणांनी मारहाण केल्याप्रकरणी गगनबावडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद
Bayaji Shelke
Bayaji ShelkeEsakal

कोल्हापूर : नेत्यांचा एकेरी शब्दाचा उल्लेख केल्यावरून गोकुळच्या (Gokul Milk Dairy)संचालकांसह सहा जणांनी मारहाण केल्याप्रकरणी गगनबावडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. याबाबत ,मणदूर (ता. गगनबावडा) (Gaganbabada)येथील ज्ञानदेव बापू कांबळे (वय ४०) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसात गोकुळचे संचालक बयाजी शेळके, (Gokul Director Bayaji Shelke)सहदेव कांबळे (रा. कोदे), शिवाजी राऊत (रा. निवडे), निलेश म्हाळुंगेकर (रा. निवडे), सूर्यकांत पडवळ (रा. मांडुकली पैकी खोपडेवाडी), तुकाराम पाटील (रा. कोदे) यांच्या विरोधात फिर्याद दाखल झाली आहे.

Bayaji Shelke
गावच्या दूध संस्थेचा सचिव कसा झाला गोकुळचा संचालक; बयाजी शेळके यांचा प्रवास

याबाबत पोलिसात ज्ञानदेव कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सहाजणांनी साळवण येथे आपणास एका कारमध्ये बसवून आणले. गोकुळचे संचालक बयाजी शेळके व अन्य संशयित तेथे उपस्थित होते. शेळके यांनी मोबाईलमध्ये असलेला व्हिडिओ दाखवला. यावेळी नेत्याचा एकेरी उल्लेख का केला आहे. असा जाब विचारत काठीने मारहाण केली. तसेच ‘तुला गावात राहू देणार नाही’अशी धमकी दिली असे फिर्यादीत म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com