
कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाने दिवाळीपूर्वी दूध खरेदी दरात वाढ जाहीर करत शेतकऱ्यांची दिवाळी गोड केली आहे.
esakal
Gokul Dudh Sangh Kolhapur : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) तर्फे पारंपरिक वसुबारस पूजन शुक्रवारी मोठ्या उत्साहात झाला. या कार्यक्रमातच म्हैस आणि गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर एक रुपयांची वाढ, पशुखाद्य दरात ५० रुपयांची कपात आणि दूध संस्था व्यवस्थापन खर्चात १० पैशांची जादा वाढ जाहीर करण्यात आली. याद्वारे ‘गोकुळ’ने दूध उत्पादक आणि दूध संस्थांची दिवाळी गोड केली आहे, अशी माहिती ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील आणि अरुण डोंगळे यांनी दिली.