Kolhapur : ‘गोकुळ’चा व्यवहार वाढला २०० कोटींनी

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाचा गेल्यावर्षीच्या तुलनेते २०० कोटी रुपयांनी व्यवहार वाढला आहे
gokul
gokul

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाचा गेल्यावर्षीच्या तुलनेते २०० कोटी रुपयांनी व्यवहार वाढला आहे. दूध उत्पादकांना राज्यातील सर्वाधिक दर दिला जातो, दरम्यान यंदाच्या वार्षिक सभेत वाशी (मुंबई) व भोकरपाडा (रायगड) येथे घेतलेल्या जागा खरेदीसाठी ३२४ कोटींच्या अपेक्षित खर्चाचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला जाणार असल्याची माहिती गोकुळचे अध्यक्ष विश्‍वास पाटील यांनी आज दिली. शुक्रवारी (ता. २४) गोकुळची ५९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा होत आहे. ऑनलाईन होत असलेल्या या सभेसाठी ४१९६ सभासदांना लिंक पाठवली आहे, मात्र अजून एकही लेखी प्रश्‍न आला नसल्याचेही त्यांनी सांगितले.

पाटील म्हणाले, ‘‘वाशी जागा खरेदी केली आहे. यासाठी संघाच्या स्वभांडवलातून १९ कोटी रुपये गुंतवले आहेत. या जागेवर आवश्‍यक बांधकाम केले जाईल. दूध विक्रीची क्षमता वाढत आहे. त्यामुळे हे तत्काळ झाले पाहिजे, अशी परिस्थिती आहे. १० लाख लिटरने दूध विक्रीत वाढ झाली. वाशी येथे पॅकिंजिंग झाल्यामुळे दहा लाखांनी पॅकिंग वाढणार आहे. ज्यावेळी २० लाख लिटर दूध संकलन होईल. त्यावेळी भोकरपाडा येथील १६ एकर जागा शासनाकडून घेतली जाणार आहे. यासाठी ४४ कोटींना ही जागा घेतली जाणार आहे. इतर १३० कोटी ४० लाख खर्च अपेक्षित आहे. एकूण ३२४ कोटी खर्चाचा प्रस्ताव वार्षिक सभेच्या मान्यतेसाठी ठेवला आहे.

gokul
भारतातून कोरोना लशींची निर्यात होणार; WHO ने मानले आभार

संघाने म्हैस दुधासाठी ५.७३ पैसे व गाय दुधासाठी ५.५७ पैसे, अशी एकूण ९५ कोटी ५८ लाख रुपये दूध फरकासाठी दिले आहेत. दूध फरक ७१ कोटी ३ लाखांचे वाटप केल्याचेही श्री. पाटील यांनी सांगितले. यावेळी संचालक अरुण डोंगळे, बाबासाहेब चौगले, अजित नरके, शशिकांत पाटील-चुयेकर, प्रकाश पाटील, एस. आर. पाटील, सुजित मिणचेकर, किसन चौगले, कर्णसिंह गायकवाड उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com