esakal | Gokul Election: सहाव्या फेरी अखेर सत्तारूढ गटातील अनुराधा पाटील-सरूडकर ; महिला गटात चुरस

बोलून बातमी शोधा

null
Gokul Election: सहाव्या फेरी अखेर सत्तारूढ गटातील अनुराधा पाटील-सरूडकर ; महिला गटात चुरस
sakal_logo
By
सुनील पाटील

कोल्हापूर : गोकुळच्या निवडणुकीत महिला गटात सत्तारूढ गटातील (Womens group fifth round) अनुराधा पाटील-सरूडकर यांना सहाव्या फेरीअखेर 1277, तर शौमिका अमल महाडिक यांना 1281 मते मिळाली आहेत. विरोधी गटातील सुश्‍मिता राजेश पाटील यांना 1284, तर अंजना केदारी रेडेकर यांना 1409 मते मिळाली.

गोकुळच्या निवडणुकीतील मतमोजणीस उदकहत (Gokul Voting) सकाळी सुरवात झाल्यानंतर महिला गटाने सर्वांचेच लक्ष वेधले. दोन फेऱ्यांत सत्ताधारी गटाच्या पाटील-सरूडकर यांनी 415, तर महाडिक यांना 410 मते मिळाली होती. विरोधी गटाच्या सुश्‍मिता पाटील यांना 420, तर रेडेकर यांना 463 मते मिळाली. चौथ्या फेरीत सरूडकर यांना 881, महाडिक यांना 858, तर विरोधी गटाच्या पाटील यांना 843 व रेडेकर यांना 925 मते मिळाली होती.

पाचव्या फेरीत सत्ताधारी गटातील महाडिक व विरोधी गटातील रेडेकर यांनी मताधिक्‍यात आघाडी घेतली. दरम्यान, महाडिक यांच्या आघाडीने सत्ताधारी गटाला दिलासा मिळाला. त्यामुळे पुढच्या फेरीत कोण मताधिक्‍य अधिक घेणार याकडे समर्थकांचे लक्ष लागून राहिले आहे.

हेही वाचा- Gokul Election :सतेज पाटील गटाचे खाते उघडले: मिणचेकर, पाटील, शेळके विजयी

Womens group fifth round Gokul Doodh Sangh Election results kolhapur marathi news