

Gokul Milk Union Election Vishwas Patil Files Nomination With Five Others 15 Candidates Submit 19 Forms in Kolhapur
sakal
कोल्हापूर: जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीसाठी आज माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांच्यासह सहा उमेदवारांचे एकूण आठ अर्ज दाखल झाले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा दुसरा दिवस होता. रमणमळा येथील बहुउद्देशीय सभागृहात ही प्रक्रिया सुरू आहे. गुरुवारी (ता. १७) अनेक उमेदवारांचा मुहूर्त असल्यामुळे अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडणार आहे.