

Gokul Milk Union Politics
Esakal
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवड आज होत असून चार शासन नियुक्त संचालकांची मते महत्त्वाची ठरणार आहेत. या चार संचालकांना मतदानाचा अधिकार देण्याच्या अध्यादेशाला औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे त्यांना अध्यक्ष निवडीत मतदान करता येणार आहे. त्यांची मते मोजली जाणार असली तरी मतदान स्वतंत्र ठेवण्यात येणार आहे. या घडामोडींमुळे गोकुळमध्ये महायुतीची सत्ता येण्याचा आणि त्यांचाच अध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.