Gokul Election Scrutiny : छाननीत इच्छुकांना जोर का झटका धीरेसे दुबार अर्जाने तारले, अंदाजे ५८ अर्ज अवैध; आज अधिकृत घोषणा

Milk Supply Rules Affect Candidate Applications : गोकुळ दूध संघाच्या निवडणूक अर्जांच्या छाननीत दूध पुरवठा, मतदार यादीतील नाव आणि इतर पोटनियमांतील त्रुटींमुळे अंदाजे ५८ अर्ज अवैध ठरल्याचे समजते.
Gokul Election Scrutiny

Gokul Election Scrutiny

esakal

Updated on

कोल्हापूर : दूध पुरवठ्याचे दिवस कमी भरले, अर्जावरील नाव आणि मतदार यादीतील नावात फरक राहिला. पशुखाद्य खरेदी कमी झाली, अशा पोटनियमांमुळे आज गोकुळ दूध संघाच्या निवडणूक छाननी प्रक्रियेत अंदाजे ५८ अर्ज छाननीतून अवैध ठरल्याचे समजते. त्यामुळे इच्छुकांची अवस्था ‘जोर का झटका धीरेसे’ झाली. काहींच्या दुबार अर्जामुळे ते तरले. वैध-अवैध उमेदवारांची अधिकृत यादी उद्या (ता.२३) सकाळी अकरा वाजता जाहीर केली जाणार आहे.

रमण मळा येथील बहुउद्देशीय सभागृहात आज छाननी प्रक्रिया पूर्ण झाली. येथे माजी संचालक मुरलीधर जाधव यांचा सर्वसाधारण गटातील अर्ज अवैध ठरवला. यासाठी २४० दिवसांत ४० हजार लिटर दूधाचा पुरवठा केला पाहिजे, अशी अट असताना त्यांचा दूध पुरवठा १३१ दिवसांत झाल्याचे कारण देण्यात आले. मात्र, त्यांचा ‘ओबीसी’ गटातून दुसऱ्या दूध संस्थेतील दुबार अर्ज वैध ठरल्यामुळे त्यांचा पत्ता कट होताना वाचला आहे.

Gokul Election Scrutiny
Mumbai News: गणेश विसर्जनाला मोठी गर्दी होणार! मुंबईतील महत्त्वाचे रस्ते वाहतुकीसाठी बंद, मेट्रो सेवेतही बदल; वाचा सविस्तर

जिल्हा बॅंकेचे निवृत्त अधिकारी हंबीरराव वळके यांच्याकडून आवश्‍यक दूधाचा पुरवठा झालेला नाही. लंपी आजारामुळे कमी दुधाचा पुरवठा झाल्याचे ग्राह्य न धरल्यामुळे त्यांचा अर्ज अवैध केल्याचे त्यांनी स्वतः सांगितले. तसेच याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये दाद मागणार असल्याचे सांगितले.

माजी संचालक एस. आर. पाटील यांचे मतदार यादीत संभाजी रंगराव पाटील असे असल्यामुळे त्यांचा सर्वसाधारण गटातील अर्ज अवैध ठरवण्यात आला. मात्र, त्यांनी दुबार अर्ज संभाजी रंगराव पाटील असाच सर्वसाधारण गटातून भरल्यामुळे तो अर्ज वैध ठरविण्यात आला. एन. टी. प्रवर्गात जिल्हा बॅंकेच्या संचालक स्मिता गवळी याचे पती युवराज गवळी यांच्या अर्जातही त्रुटी राहिल्यामुळे तो अवैध ठरला; मात्र नंतर त्या त्रुटी दूर केल्यामुळे त्यांचा अर्ज वैध ठरवला असला तरीही आज निकाल राखीव ठेवला आहे. उद्या त्याची घोषणा होईल, असे त्यांनी सांगितले. याचवेळी अशोक खोत, राजेंद्र जाधव, रामचंद्र डांगे यांच्या अर्जावरही त्रुटी निघाल्याचे सांगण्यात आले. काहींनी अर्जातील त्रुटींची पूर्तता केली आहे. प्रत्यक्षात उद्या (ता.२४) छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्याचे जाहीर करून पात्र-अपात्र उमेदवारांच्या नावांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com