Gokul Election : अर्ज छाननीवेळी प्रवेश बंदीने तणाव पावती दाखवल्यावरच प्रवेश; गटनिहाय छाननी झळकली स्क्रिनवर, कार्यकर्ते मैदानातच

Candidates and Proposers Stopped Outside Hall : पावती तपासल्यानंतर उमेदवार, सूचक आणि अनुमोदकांना गटनिहाय सभागृहात प्रवेश देण्यात आला, तर कार्यकर्त्यांना मैदानात थांबावे लागले.
Gokul Election

Gokul Election

esakal

Updated on

कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या निवडणुकीसीठी दाखल केलेल्या अर्जांची रमण मळा येथील बहुउद्देशीय सभागृहात छाननी प्रक्रिया झाली. यावेळी मंडपात काही उमेदवार, सूचक अनुमोदक यांना पोलिसांनी प्रवेश दिला नसल्यामुळे तणाव निर्माण झाला. अखेर पावती पाहून सर्वांना आत प्रवेश दिला. त्यामुळे छाननी प्रक्रिया सभागृहात आणि कार्यकर्ते मैदानात असे चित्र होते.

बरोबर अकरा वाजता छाननी प्रक्रिया सुरू होणार असल्यामुळे सर्वांना साडेदहापूर्वीच सभागृहात बोलावण्यात येणार होते. त्यामुळे साडेनऊ-दहाच्या सुमारास सभागृहाचे पार्किंग फुल झाले होते. मात्र, पोलिसांनी मंडपाच्या बाहेर असलेल्या बॅरिकेडस्‌जवळ सर्वांना अडविले होते. सुरुवातीला उमेदवार, सचिव यांनाच आता प्रवेश दिला.

Gokul Election
१ हजार ते ६,००० रुपयांत गरबा पार्टनर, व्हायरल पोस्टरनंतर भाजप आमदार आक्रमक; कठोर कारवाईची मागणी

यामुळे तेथे वादाचे प्रसंग घडले. भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील हे उमेदवार असूनही पोलिसांनी अडवले. तेथे पोलिसांसोबत वाद झाला. अनेकांनी दुबार अर्ज दाखल केले होते. येथे त्यांचे सूचक वेगळे होते. त्यांना आत सोडले जात नसल्यामुळे त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. यामुळे काहीकाळ तणाव झाला. अखेर त्यांना आत प्रवेश द्यावा लागला. सभागृहात जाण्यापूर्वीच व्हरांड्यामध्ये सर्वसाधारण व इतर असे गटनिहाय टेबलवर माहिती द्यावी लागत होती. त्यानंतर सभागृहात प्रवेश दिला जात होता.

ज्या गटाची छाननी त्याच गटातील संबंधितांना पावती पाहूनच सभागृहात प्रवेश दिला जात होता. सभागृहात स्क्रिन उभा केला होता. व्यासपीठासमोर खुर्च्यांची व्यवस्था होती. तेथे सर्वांना एकत्रित बसविले होते. पहिल्या टप्प्यात सर्वसाधारण गटातील संबंधितांचे अर्ज का अवैध केले जात आहेत, याची माहिती दिली. काहींनी त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता केल्यावर अर्ज वैध ठरवले. मात्र, याची अधिकृत घोषणा उद्या सकाळी अकरा वाजता होणार आहे.

Gokul Election
Mumbai News: गणेश विसर्जनाला मोठी गर्दी होणार! मुंबईतील महत्त्वाचे रस्ते वाहतुकीसाठी बंद, मेट्रो सेवेतही बदल; वाचा सविस्तर

अाक्षेप आल्यास वकिलांना प्रवेश

इच्‍छुकांसह वकीलही छाननी प्रक्रियेसाठी सभागृहात दाखल झाले होते. मात्र, अाक्षेप आल्यानंतर सुनावणीवेळी बोलाविले जाईल, असे सांगून त्यांना बाहेर मंडपात बसण्याची विनंती करण्यात आली. त्यामुळे वकिलांची फौज मंडपात बसून होती. अाक्षेपानंतर संबंधित कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी तसेच युक्तिवादासाठी वकील सभागृहात जात होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com